लोणावळ्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

Two children die after drowning in salt water in Lonavala

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता या मुलांचा बुडून मृत्यू झाला

महा न्यूज नेटवर्क : लोणावळ्यात दोन मुलांचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता या मुलांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी साडे आठ वाजता ही दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित कचरा डेपोसाठी बांधकाम सुरू होते. त्यासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. याच पाण्यात ही दोन मुलं पोहण्यासाठी गेली होती. यावेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

बुडालेली मुलं कचरा वेचकांची आहेत. बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे. मुलांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पोहण्यासाठी उतरले असता बुडून त्यांचा मृत्यू झाला. एका मुलाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.