आमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात- पंकजा मुंडे

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल घेण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत खासदार छत्रपती उदयन राजे नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलिच चर्चा रंगली होती. उदयन राजे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काल घेण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत खासदार छत्रपती उदयन राजे नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलिच चर्चा रंगली होती. उदयन राजे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, आमचे भाऊ उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात त्यांना पक्षाची गरज नाही असे विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. हडपसरमधील लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचा लवकरच समारोपाचा कार्यक्रम होईल. त्यांचे ४ खासदार आहेत त्यातले तीन स्वतःच्या जीवावर निवडून येतात, असे मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे

• जे आधी गल्ला बोल म्हणायचे ते आता हल्लाबोल म्हणत आहेत.

• मुंडेसाहेबांना ठावूक होत की त्याचं आयुष्य मोठ नाही.

• जनतेच्या कल्याणाची जबाबदारी बाबांनी माझ्या खांद्यावर दिली आहे. बाबांची सर्व स्वप्न पूर्ण करणार

• ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजना म्हणजे पंकजा मुंडेंची योजना असं म्हणतात,माउलींच्या डोक्यावरची घागर खाली उतरवल्याचा आनंद आहे.

• आमचे उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात त्यांना पक्षाची गरज नाही