वैजापुरात प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

Vaijapure lover lapsed with a single rope and ended his life

 9 वाजेच्या सुमारास प्रेमीयुगुलाचे मृतदेह नांदूर मधमेश्वर कालव्याजवळील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. 

महा न्यूज नेटवर्क वैजापूररोठीवस्‍ती परिसरात प्रेमीयुगुलाने एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (मंगळवार) सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रेमीयुगुलाचे मृतदेह नांदूर मधमेश्वर कालव्याजवळील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

साक्षी बाबासाहेब शेजवळ( वय-22) आणि सागर राहूल म्हैसमाळे (वय-22) असे प्रेमीयुगुलाची नावे असून दोघे जांबरगाव (ता.वैजापूर) येथील राहाणारे होते. दोघे कालपासून (सोमवार) बेपत्ता होते. सागर हा छोटासा व्यवसाय करत होता तर साक्षी ही वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.