काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी का? – नरेंद्र मोदी

Why is Congress party only for Muslim men? – Narendra Modi

ट्रिपल तलाकवरुन काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका करताना काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी आहे का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.

ट्रिपल तलाकवरुन काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका करताना काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी आहे का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. उत्तर प्रदेश आझमगड येथे शनिवारी एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधक संसदेचे कामकाज बंद पाडण्याबरोबर ट्रिपल तलाकसारख्या महत्वाची विधेयकांचा मार्गही रोखून धरतात असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावताना पंतप्रधान म्हणाले कि, काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा आहे असे काँग्रेस अध्यक्षांनी म्हटल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही मला फक्त प्रश्न हा विचारायचा आहे कि, काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का ? कि, मुस्लिम महिलांचाही आहे ? असा सवाल मोदींनी विचारला. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देताना ते देशवासियांबरोबर खोट बोलत असल्याचा आरोप केला.

ANI UP

@ANINewsUP

I have read in newspaper that Congress President has said that Congress is a party of Muslims, I am not surprised by this. All I want to ask is, is their party only for Muslim men or for women too? Ye log sansad mein kanoon dabakar baith jaate hain: PM Narendra Mo

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेबरोबर खोटे बोलत आहेत. ते असुरक्षित झाले आहेत. मोदीजी तुम्हाला कसली भिती वाटते ? असे टि्वट काँग्रेसने केले आहे. ३४० किलोमीटरच्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे भूमिपूजन केल्यानंतर मोदी उत्तर प्रदेशातील आझमगड येथील सभेत बोलत होते.

ट्रिपल तलाकच्या मुद्यावर काँग्रेसची जी भूमिका होती त्यातून त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. केंद्र सरकार महिलांचे आयुष्यात सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि अन्य पक्ष एकत्र येऊन महिलांचे खासकरुन मुस्लिम महिलांचे जीवन खडतर बनवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले.