… तर कोणत्याही भाजप मंत्र्याला नगर जिल्ह्यात फिरू देणार नाही; शेतकऱ्यांचा इशारा

will not let any BJP minister rot in Nagar district; Farmer’s Warnings

शेतीमालाला व दुधाला भाव नसल्यामळे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी अहमदनगर मधील खडकी येथे रास्तारोको केला होता. शेतीमालाला व दुधाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. दुधाला कमीत कमी शासनाने ठरवलेला २७ रुपये भाव व शेतमालाला हमी भाव न मिळाल्यास यापुढे पालकमंत्री यांच्यासह सरकारधील सर्वच मंत्र्याना अहमदनगर जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे महेश कडूस, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कारभारी गवळी, उपसरपंच भाउसाहेब रोकडे, राहुल बहिरट, अरुण कोठूळे, राघु चोभे, राजेंद्र चोभे, कैलास पठारे, सरपंच जनार्धन माने यांच्यासह विविध गावातिल शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. सुमारे अर्धा तास रस्तारोको करण्यात आल्यानंतरही कोणीही जबाबदार अधिकारी निवेदनसुद्धा स्वीकारायला आला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.