काम चांगले, पण घाई झाली : पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मात्र त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी काम चांगले झाले आहे, मात्र उदघाटनाची घाई झाली असे मत त्यांनी व्यक्त केले.

महा नुज्य नेटवर्क पुणे:- महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मात्र त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी काम चांगले झाले आहे, मात्र उदघाटनाची घाई झाली असे मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात शरद पवार यांच्या हस्ते या विस्तारित इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले होते. सध्या भाजपाच्या सत्ताकाळात या कामास पूर्णत्व आले आहे. सव्वा तीन वर्षात हे काम पूर्ण झाले असून त्यासाठी ४८ कोटी रुपये खर्च झाला आहे. पवार यांनी स्वच्छतागृहापासून  ते महापौर पदाधिकारी यांच्या दालनाची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सुचनाही केल्या. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यावेळी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते चेतन तुपे तसेच अन्य नगरसेवकांसोबत पवार यांनी इमारतीच्या सर्व मजल्यांची बारकाईने पाहणी केली. बरीच कामे अपुर्ण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी असे होते तर कार्यक्रमाची घाई का केली अशी विचारणा केली.