पँट घातली नसल्याने यामी गौतमच्या बहिणीला काढलं रेस्टॉरंटबाहेर

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला

 

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पँट घातली नसल्याचं सांगत सुरिलीला रेस्टॉरंटच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. सुरिली आपली बहिण यामी गौतमसोबत ‘उरी’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेरबियामध्ये आहे. यानंतर यामी गौतमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर व्हिडीओ शेअर केला असून, आपल्या बहिणीला रेस्टॉरंटमध्ये का प्रवेश दिला नाही हे सांगायला सांगत आहे.

या घटनेमुळे यामी गौतम आणि सुरिली प्रचंड चिडल्या असतील असा विचार करत असाल तर तसं काही झालेलं नाहीये. दोघी बहिणी सेरबियामध्ये मजा मस्ती करत असून आपले फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत आहेत. व्हिडीओतही दोघी ही घटना मस्करीत घेत असल्याचं दिसत आहे.

सुरिली राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भुमिकेत असणार आहे. आपल्या बहिणीच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी आपण प्रचंड उत्सुक असल्याचं यामीने सांगितलं होतं. चित्रपटाचं शुटिंग अद्याप सुरु झालं नसल्याने सुरिली सध्या यामीसोबत उरी चित्रपटाच्या सेटवर वेळ घालवत आहे.